२२ जुलै रोजी होणाऱ्या पिकवीम्या संदर्भातील बैठकीत पिकवीमा मंजूर करा अन्यथा न्यायालयीन लढाई लढू – एल्गार संघटना
गजानन सोनटक्के जळगाव जा – आम्ही एल्गार संघटनेच्या वतीने गेली ८ महीने झाली सातत्याने खरिप पिकवीमा २०२० मिळावा त्या संदर्भात आंदोलने, पाठपुरवठा करित आहोत. आपणास त्या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील खरिप हंगामाची वास्तविक परिस्थिती व हवालदिल झालेला शेतकरी या संदर्भात निवेदन दिले. प्रत्यक्ष चर्चा सुद्धा केली आहे. परंतु अद्यापही रिलायंस जनरल इन्शुरन्स पिकवीमा कंपनीने पिकवीमा मंजूर केलेला नाही.
कृषि विभागाच्या प्रसिद्धी माध्यमातून २२ जुलै २०२१ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पिकवीम्या संदर्भात मंत्रालयात कृषि विभागाची बैठक बोलावल्याचे कळले. त्या निमित्ताने आम्ही एल्गार संघटनेच्या वतीने या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी पिकवीम्या संदर्भात काही सकारात्मक चर्चा होऊन पिकवीमा मंजूर होईल ही आशा बाळगतो.ते न झाल्यास आधी शासनाला दिलेल्या निवेदना नुसार आम्ही मा.उच्च न्यायालया मार्फत येत्या काही दिवसात जनहित याचिकेच्या माध्यमातून न्याय मागनार अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.