गजानन सोनटक्के जळगांव जा. प्रतिनिधी :- सुनगाव येथील शेतकऱ्यांनी दिले जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांना सन 2020 व 21 च्या पिक विमा मिळणेबाबत दिनांक 12 जुलै रोजी देण्यात आले निवेदन. मागील वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस मूग उडीद ही पिके पूर्ण नष्ट झाली तर मून सोयाबीन पिके ही घरी सुद्धा आणले नाही महसूल विभाग व कृषी विभागाने या शेतकऱ्यांचा पीक पाहणी पंचनामा केला असता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्याची आनेवारी ही 37% नक्की आलेली आहे शासन निर्णय शेतकऱ्यांना आणेवारी कमी आल्यामुळे पिक विमा मिळणे आवश्यक होते परंतु शेतकऱ्यांना आज पर्यंत सुद्धा पिक विमा मिळाला नाही सुनगाव येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे ही विनंती केली की शासन दरबारी व विमा कंपनी यांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून द्यावा सदर निवेदन देण्याकरिता सुनगाव येथील सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, अशोक काळपांडे, मोहनसिंग राजपुत,प्रविण धर्मे,पत्रकार गणेश भड,पत्रकार गजानन सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे,किसन ताडे, प्रमोद नानग्दे,त्रिलोक राजपुत,प्रमोद वानखडे,संजय राजपूत,मंगेश वंडाळे,श्रीराम राउत,अतुल गिर्हे, लक्ष्मण धुळे, पंकज भगत, मधुकर धुळे, किसना ताडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी या वेळी उपस्थित होते
Related Posts