नवीन पीक कर्ज आणि कर्जाचे पुनर्गठन तात्काळ वाटप करणेबाबत जिल्ह्याधिकारी श्री. एस. राममूर्ती यांना निवेदन

Related Posts
गजानन सोनटक्के जळगाव जा
बुलढाणा जिल्ह्यासह जळगांव जा.तालुक्यात देखील शेतकरी वर्ग हा पेरणी पूर्व मशागती च्या कामामध्ये व्यस्त आहे. परंतु तालुक्यातील शेतकरी बांधवासमोर पेरणी कशी करावी हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी नापिकी झाल्यामुळे बळीराजा हा आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला असतांना खरीप हंगामात काढलेल्या पीक विम्याची रक्कम देखील अजुन पर्यंत मिळाली नाही. पेरणी ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे असे असतानाही राष्ट्रीय कृत बँक ही शेतकरी बांधवाना नवीन पीक कर्जे वाटप तसेच मागील वर्षी घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी स्थानिक बँकांकडून नाहक त्रास दिला जात आहे ह्या सगळ्या प्रश्ना प्रकरणी जळगांव जामोद येथे आज दिनांक 28 मे 2021 रोज शुक्रवारी जिल्ह्याधिकारी श्री एस. राममूर्ती यांना तर उपविभागीय अधिकारी (महसूल ) देवकर मॅडम , तहसीलदार श्री. शिवाजीराव मगर साहेब याचे उपस्थितीत सातपुडा विश्रामगृह याठिकाणी शेतकऱ्यांकरिता तात्काळ पीक कर्ज वाटप करणे संदर्भातील मागणी करून निवेदन सादर करण्यात आले असता त्यांनी तत्काळ सोबत असलेल्या तहसीलदार श्री मगर साहेबांना पीक कर्ज वाटप त्वरित कसे करायचे त्यासंबंधी निर्देश दिले.यावेळी नगरसेवक श्रीकृष्ण केदार, पत्रकार भीमराव पाटील, मडाखेड खु. चे सरपंच राजेश क्षित्रे पाटील, नगरसेवक संदीप मानकर ख. वि.समिती संचालक संजय भुजबळ, भागवत पाखरे, युवराज देशमुख