सण 2018 – 2020 च्या पदव्युत्तर विद्यार्थी यांच्या अनामत रक्कम चा परतावा लवकरात लवकर द्या -प्रसाद देशमुख
वाशिम – डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत पदव्युत्तर शिक्षण संस्था येथे शिक्षण घेत असलेल्या सन 2018 ते 2020 च्या विद्यार्थी यांचे महाविद्यालयात जमा असलेले अनामत रक्कम चा परतावा अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेला नाही.
महाविद्यालयातुन उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण , नौकरी हेतू विद्यार्थी पुढे गेले आहेत. सदर प्रक्रिया पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला आहे . अनामत म्हणुन महाविद्यालयात महाविद्यालय अनामत रक्कम ” 3000 रुपये ” तर वसतिगृह साठी “2000 रुपये” जमा केले होते. अशी दोन्ही मीळुन 5000 रुपये अनामत विद्यार्थ्यांनी जमा केलेली आहे . आजघडीला याचा परतावा विद्यार्थ्यांना मिळालेला नाही .डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये शिकणारे बऱ्यापैकी विद्यार्थी हे कष्टकरी , शेतकरी कुटुंबातून येतात .सर्व विद्यार्थी यांनी महाविद्याला सर्व कागतपत्रांची पूर्तता केलेली आहे तसेच आपल्या बँक पासबुक चे छायांकित प्रत सुद्धा कार्यालयाला जमा केली आहेत.कृपया या प्रकरणात लवकरात लवकर लक्ष घालावे ही सर्व विद्यार्थी यांना न्याय द्यावा अशी मागणी सर्व विद्यार्थी यांच्या तर्फे शिवशंभु फाऊंडेशन महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी ई-मेल द्वारा निवेदन देत सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था , विद्यापीठ प्रशासन यांच्या कडे केली आहे.