सिंदखेड राजा – ऊपलब्ध प्रसारमाध्यमांचा सकारात्मक वापर केल्यास समाजमनात काही सकारात्मक गोष्टी घडत असतात.तस पाहिल तर आजमितीस व्हाँटसअप, फेसबुकच्या अतिवापराने त्याचा विट आल्याची भावाना लोकांच्या मनात आहे.पण या घटनेने त्याचा वापर किती योग्य आहे. हे दिसुन येते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौके गावात वास्तव्यास असलेले डाँ शरद काळसेकर यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील वर्ग मिञांच्या गृपवर पुर्वीच्या सुमती वाघ व आताच्या द्वारकाबाई ढोले यांच्या विषयीची पोष्ट केली सदर पोष्ट व्हाँटसअपच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यासह मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यात पोहचली.नुसतीच पोष्ट न पाहता गांभीर्य पूर्वक काही सकारात्मक करता येते का ही दृष्टी असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रविण गिते यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, पञकार, समाजबांधव, यांच्या सोबत तातकाळ संपर्क करत सदर पोस्ट करणारे डाँक्टरचा मोबाईल नंबर मिळवीला .डाँ.काळसेकर यांच्या सोबत बोलने झाल्यावर चिंचोली येथील सरपंच भगवान पालवे, राजु वाघ यांच्याशी संपर्क करीत बोलने झाले. याचेच फलीत म्हणून २० वर्षापासून बेपत्ता असलेल्या सुमती वाघ यांची भेट झाली. मुंबई त वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मुलाशी बोलने झाल्याने तो तात्काळ त्या ठिकाणी गेला प्रशासकीय सोपस्कार पुर्ण करुण आज दिनांक ११ जुन रोजी सुमती वाघ आपल्या मुलासह चिंचोली गावात दाखल झाल्या. त्या निमित्ताने गावकरी मंडळीने या कामात सहकार्य करणारे प्रविणभाऊ गिते यांना बोलाऊन घेतले. यावेळी त्यांनी सदर माऊलीचे आगमनानिमितांन पुष्प गुष्छ देऊन स्वागत केले.
यांचे उपकार फिटणार नाही
या सर्व शोध मोहिमेच्या कामी पडलेल्या डाँ.शरद काळसेकर,त्याना इतके वर्ष आधार देणाऱ्या सभापती मनीषाताई वराडकर,आम्हला डॉकटर काळसेकर व इतर नंबर उपलब्ध करून देणाऱ्या सरीता पवार, त्याचबरोबर सामाजिक स्तरावर महत्त्व पुर्ण अशी भुमिका निभावणारे कर्तव्य तत्पर विजय घुगे,सोपान घुगे,रमेश सोसे, पोलिस काँन्सटेबल जायभाये साहेब,सरपंच भगवान पालवे व प्रकास मुंढे राजुभाऊ वाघ, व सिंधुदुर्गातील समाज बांधव यांनी सहकार्य केल्यामुळेच ही माऊली आपल्या आप्तस्वकिया कडे पोहचू शकली.त्यामुळे त्या सर्वांचे आभार मानावे तेव्हडे थोडे आहे.
याप्रसंगी आडगावराजाचे सरपंच रामदास कहाळे चिंचोली येथील सरपंच भगवान पालवे ऊपस्थित होते.