सिंदखेडराजा( सचिन मांटे,दि,३१ मे,२०२२) -आज राज्यासह इतर राज्यात पेट्रोल डिझेल चालकाचा संप आहे.संपाचे मूळ कारण पाहत वाढीव झालेली इंधन वाढ केंद्र सरकारणे काही दिवसाअगोदर इंधन दर कमी केले पण २०१७ पासून पंपचालक यांची कमिशन वाढ झाली नसून आतापर्यंत त्यांना कमी कमिशन मध्ये डिझेल व पेट्रोल विक्री करावी लागत आहेत.
काही दिवसपूर्वी कमी झालेली इंधन वाढ यामुळे साठा करून ठेवलेले वाढीव दरातील इंधन हे कमी पैश्यामध्ये विकावे लागत आहेत त्याचा फटका पम्प चालकांना यांना पडत आहेत त्यामुळे आज महाराष्ट्रसह इतर राज्यात संप आहेत पण त्यातून सामान्य नागरिकांना,शेतकऱ्यांना या संपाचा फटका बसला आहे मान्सून तोंडावर असून शेतीची कामे ट्रकटर ने होत असून आज डिझेल साठी चक्क.नागरिकांनी रांगा लावत डिझेल खरेदी केले