
अकोला – कृषी महाविद्यालय अकोला येथील दोन दिवसीय दि. २५ व २६ जून २०२१ वार्षिक स्नेसंमेलनाचा समारोप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम पत्रिकेनुसार आज पार पडलेले स्पर्धा व त्यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी रांगोळी(१५ विद्यार्थी) व पोस्टरमेकिंग स्पर्धा (१० विद्यार्थी), फॅशन शो (८ विद्यार्थी), अंताक्षरी (८विद्यार्थी), गीत सादर करणे (५ विद्यार्थी), नृत्य (१५ विद्यार्थी), फिश पोंड सदर स्पर्धा आभासी पद्धतीने पार पडल्या असून विद्यार्थ्यांनी घरी बसून आनंद घेतला आहे सदर स्नेसंमेलन कार्यक्रमास सिने अभिनेते अमित ठोकळ यांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला तसेच या कार्यक्रमास मोठ्या प्रमानात विद्यार्थी व प्राध्यापक वृंदांचा सहभाग लाभला. समारोपीय कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. एस. पी.लांबे, डॉ. आर.आर.शेळके डॉ. प्रज्ञा कदम , प्राध्यापक वीरेंद्रजी ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
आज अंतिम दिवसाचे समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा जुमणाके हिने केले तर आभार प्रदर्शन आदित्य कानडे याने केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस अथक परिश्रम घेतले.