गजानन सोनटक्के जळगाव जा – मागील वर्षीचा हक्काचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे, व शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी कंपनी विरोधात बोलत नसल्यामुळे आज पासून होऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान तरी लोकप्रतिनिधीनी बोलते व्हावे याकरिता विधान भवना समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यावेळी पोलिस प्रशासनाने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार केला. मी सर्व प्रथम पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो.
अश्याच अधिकाऱ्यांच्या मुळे आज शेतकऱ्यांचा आवाज दबत आहे. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार होतो. परंतु सरकारच्या दबावापोटी मुंबई पोलीस प्रशासनाने आम्हाला अटक केले. माझी पोलिस प्रशासनाला विनंती आहे की आपण सुद्धा शेतकऱ्यांचे मुल आहात आम्हाला आमचे प्रश्न मांडण्यासाठी विधान भवना जवळ जाऊ द्या.अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला कळणार सुद्धा नाही कि *आम्ही विधान भवनात कधी धाड टाकू असा इशारा या निमित्ताने दिला .