संग्रामपुर (ता.प्र) : मागील वर्षी सतत पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पुर्णतः सोयाबीन उध्वस्त झाले होते ,एक किलो सोयाबीन सुद्धा शेतकऱ्यांच्या घरामध्ये आले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन चा पीकविमा मिळणे अपेक्षित होते. परंतु अद्याप पर्यंत कंपनी कडून शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नसल्याचे जाणीव करून देण्यासाठी १६ जुन पासुन जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांनसह आंदोलन करणार असल्याचा निर्णय ९ जुन रोजी संग्रामपुर येथे पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. कंपनीने जिल्ह्यातील एकही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक रुपया सुद्धा दिलेला नाही.

आणि पीकविमा मिळतो की काय ही शंका आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे , यापुर्वी पीकविमा कंपनीच्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेक आंदोलन केले , मोर्चे काढले परंतु पीकविमा कंपनी काही दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील एकही आमदार कंपनी विरोधात बोलत नाहीत. म्हणजेच या कंपनीचे व आमदारांचे साटेलोटे आहे का? असा घणाघात आरोप स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बैठकीत आज बोलतांना केला आहे. तुम्हाला अदानी अंबांनीने निवडुन दिले नाही. तर शेतकऱ्यांनी मतं दिले. तुम्ही शेतकरी, शेतमजुरी कष्टकऱ्यांचे लोकप्रतिनिधी आहास तरी सुद्धा विमा कंपनी विरोधात का बोलत नाही. याची जाणीव करून देण्यासाठी. येत्या १६ जून रोजी पहिला टप्पा जळगाव जा.मतदार संघातुन आ.डॉ संजय कुटे यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन सुरू करणार असल्याचे प्रशांत डिक्कर यांनी सांगितले या बैठकीला उज्वल चोपडे, गोपाल तायडे, योगेश मुरुख, तेजराव लोणे,विलास तराळे, विजू ठाकरे, गणेश माळोकार, शिवाजी चिकटे,अरूण वानखडे, श्याम ठाकरे, शिवा पवार,नयन इंगळे, गजानन रावनकार, आशिष सावळे, भास्कर तांदळे,विठ्ठल कापसे, प्रवीण रौदळे, प्रशांत बावस्कर,अजय ठाकरे, गजानन पांडव, राजू उमाळे, बहूसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते..