महाराष्ट्र मुंबई – सध्या राज्याच्या राजकारणात होत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे व सरनाईक यांच्या लेटर बॉम्ब मुळे आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होत असतांनाच अशातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झालेली भेट व त्यानंतर महाराष्ट्रात भाजप-सेना एकत्र येणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे, काँग्रेससह राष्ट्रवादीचे नेतेही हे सरकार 5 वर्षे टीकेल असे ठणकावून सांगतांना दिसत आहेत.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या टेलरबॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्यांनी या पत्रावरुन महाविकास आघाडी सरकावर टीका करायला सुरुवात केली आहे व आघाडीच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केले आहे . तर काही भाजपा नेत्यांकडून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येईल, असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे का ? असं विचारण्यात आलं असता त्यांनी स्पष्ट नकार दिला अजिबात नाही. भाजपाला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच हे सरकार स्थापन करण्यात आलं होतं. भाजपने राज्यात सर्व गोंधळ घातला होता. आमचं आजही उद्दिष्ट तेच आहे. काँग्रेस काही जिल्ह्यांमध्ये मजबूत नसून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे , असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. तसेच, शिवसेना-काँग्रेसच्या विचारभिन्नतेबाबतही त्यांनी स्पष्टपणे मत मांडलं. तुम्ही त्याकडे हवं तसं पाहू शकता. पण, हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने तयार करण्यात आलं आहे. आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो , पण भाजपाला अजिबात नाही , असे थेट उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय.