पातळगंगेच्या पुलावरचे तुटले कठडे पुलावरन जातांना जीव मुठीत – संबंधित विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज.
सिंदखेड राजा सचिन मांटे – सिंदखेड राजा तालुक्यातील किनगावराजा येथील पातळगंगा नदीच्या पुलावरचे कठडे तुटल्याने पुलावरन पाई जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावा लागत आहे. सदर नदीवरच्या पुलाचे साईटचे कठडे कमकुवत व तुटलेले असल्यामुळे पुलावरून पाई जाणाऱ्यांना आपलं जीव मुठीत धरून जावं लागत आहे. २२ जुनच्या रात्री साडे अकरा वाजेरच्या सुमारास अचानक आयशरचे समोरचे टायर फुटल्याने पुलाचे कठडे तोंडून आयशर पुलाखाली पडले सदर झालेल्या अपघातात सदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. आयशरमध्ये तीन इसम अडकून पडले असताना गावातील काही युवकांनी तात्पर्य राखून आयशरमध्ये अडकून असलेले तीन युवकांचे जीव वाचवले आहे. या तीन युवकांना बाहेर काढून विचारपूस केल्यानंतर सदर आयशर हे समृद्धी महामार्गावर चालू असलेल्या कामावरच्या कंपनीचे असल्याचे दिसून आले ,सदर आयशर मध्ये लोखंडी रॉड होते. आयशरच्या अपघातामुळे पूलावरचे एका बाजूचे पूर्ण कठडे तुटल्याने पुलावरून पाई जात असणाऱ्याना जीव मुठीत धरून जावे लागत आहे या पुलावरून गावातील शाळेत व महाविद्यालयात जाणारे मुले,मुली व शेतात जाणारे शेतकरी व महिला वर्ग यांना जीव मुठी धरून जावं लागतं आहे . तरी दोन्ही पुलावर संबंधित विभागाने लक्ष देण्यात यावे नाही तर सदर पुलावर मोठा अपघात घडून येण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे.