कुठं जमीन खरडली, तर सोयाबीन,कपाशीची पिके वाहून गेली
सिंदखेडराजा(प्रतिनिधी.सचिन मांटे) सिंदखेडराजा तालुक्यात पावसाचा कहर सुरुच आहे त्यातच ११ ऑक्टोबर व १३ ऑक्टोबर पावसाने कहरच केला,सिंदखेडराजाकिनगावराजा,विझोरा,वागजाई,साठेगाव,पिंपळगावलेंडी,शेलगाव,सांवगी,पळसखेड,राहेरी,या संपूर्ण भागात पावसाने कहर केली,कपाशी व सोयाबीन या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्याकडून नुकसान भरपाई ची मागणी होत आहे,
ऐन सोयाबीन या पिकाचा तोंडघास पावसाने हिरावून घेतला त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे,बळीराजाने याअगोदरच याच पिकाच्या भरवषावर खाजगी सावकार व्याजाने व बँककडून घेतलेल्या पैशाची परतफेड कशी करावी? कर्ज फिटेल का? अशा चिंतेत शेतकरी दिसत आहे त्यातून न सावरता ज्या सोयाबीन पिकाची पेरणी भारतात लावन्यासाठी भारतात बंदी आहे अश्या सोयाबीन ची आयात करून सोयाबीन या पिकाला भाव पहिलेच कमी देऊन सरकाने शेतकऱ्यांवर अन्याय केला त्यात आता बळीराजा अस्मानी संकटाना तोंड देतोय,पावसाच्या कहर एवढ्या प्रमानातं झाला की झाला की जमीन वाहून गेली,पावसाने कपाशी झोपली,तरी सरकारने कुठलेही निकष लावता शेतकऱ्याना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांकडून होत आहे.