देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन ची कमी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना आव्हान केले होते देशातील पहिला ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने उभा केला आहे. आज या ऑक्सिजन प्रकल्पाचा उद्घाटन शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडला.

साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्माण करून कोरोनाच्या संकट काळात जनतेला जीवनदान देणारा देशातील पहिला प्रकल्प म्हणून धाराशिव कारखान्याची नोंद झाली आहे. केवळ १७ दिवसात या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यातून २० टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्हातील कोरोना बाधित रुग्णांना लागणारा ऑक्सिजन पूर्ण क्षमतेने पुरवला जाणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव देशात पोचवून ऑक्सिजनची निर्मिती करणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील हे पंढरीचा पांडूरंगच साक्षात धावून आल्याचं समाधान वाटते. त्यांनी दाखवलेले हे धाडस खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. श्री.पाटीलजी व पूर्ण संचालक मंडळ यांचे खूप खूप आभार..!
या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्य महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय ना.नितीनजी गडकरी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील साहेब, आरोग्य मंत्री ना. राजेशजी टोपे साहेब, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. शंकरराव गडाख-पाटील साहेब, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील, कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील,जिल्हाधिकारी कौतुभ दिवेगावकर यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.