खुश खबर बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री डॉक्टर शिंगणे यांच्या प्रयत्नांतून ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित
कोरोनाने हैराण केले असतांना ऑक्सिजन तुटवड्यावर निदान म्हणून ऑक्सिजन जनरेशन प्लांट ठिकठिकाणी उभारण्यात येत आहेत. आज १५ मे रोजी बुलडाणा येथील स्त्री रुग्णालय समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट चेे उद्घाटन जिल्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाची फॉरम्यालिटी रद्द करत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी फक्त पाहणी करून सदर प्लांट कार्यान्वित झाला असल्याची घोषणा केली.
जिल्ह्याला दररोज जवळपास १६ मे.टन ऑक्सिजन लागतो. आता या प्लांट व्दारे ८० जम्बो सिलींडर हवेतील ऑक्सिजन २४ तासात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा वापर न करता, थेट प्लांटपासून रुग्णांच्या बेडला ऑक्सिजन पाइपलाईन अटॅच करुन रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येईल.

देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर व इतरही ठिकाणी प्लांट लवकरच उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या कोरोना लाटेच्या शक्यतेमुळे राज्य स्वंयपूर्ण होत असतांना बुलडाणा जिल्हा देखील सर्वार्थाने स्वंयपूर्ण करणार असल्याचा विश्वास यानिमित्ताने पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला .असे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे कार्यालयाकडून प्रसिद्द करण्यात आले .