किनगावराजा दि.१७(प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या ग्राम उमरद येथील गावठानच्या रोहित्राची दुरावस्था झाली असून.यामुळे होत असलेल्या विजेच्या लपंडावास ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

येथील झोपडपट्टी जवळील असलेले हे गावठाणातील रोहितत्राचे सात ते आठ महिन्यापासुन केबल खराब आहे ,फ्युज वारंवार जातात , महावितरण कडे तक्रार देउन सुध्दा त्यांचे याकडे दुर्लक्ष आहे . त्यामुळे ग्राहकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे , झोपडपट्टी वरील गावकर्यांच्या वतीने किनगावराजा महावितरणाने नविन केबल सर्विस टाकण्यात यावे ,व फ्युज टाकण्यात यावे अशी विनंती करण्यात येत आहे .