गजानन सोनटक्के जळगांव जा. प्रतिनिधी : जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या सुनगाव येथील वनविभागाच्या भिंगरा पूर्व एक बीडमध्ये एका अनोळखी 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली दिनांक 21 जुलै च्या सकाळी सात वाजेच्या दरम्यान वनविभागाचे वनरक्षक अरुण गुलाबराव भुईकर वय तीस वर्ष हे पूर्व भिंगारा एक वनखंड क्रमांक 367 मध्ये गस्त करीत असताना यांना दुर्गंध आली असता त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बघितले असता त्यांना कुजलेल्या अवस्थेत अंदाजे 65 वर्षीय अनोळखी वृद्धाचे प्रेत दिसून आले.
वनरक्षक भुईकर यांनी सदर घटनेची फिर्याद जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली घटनेची फिर्याद मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद वानखडे पोलीस हेडकॉन्स्टेबल राऊत पोलीस कॉन्स्टेबल इंगळे पोलीस नाईक गणेश पाटील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच वनविभागाचे कर्मचारी हे सर्व घटनास्थळी पोचून त्यांनी कुंजलेल्या अनोळखी प्रेताचा पंचनामा केला सदर अनोळखी वृद्धाचे प्रेत हे अंदाजे तीस ते पस्तीस दिवसापासुन पडलेले असल्याचे दिसते सदर वृद्धाचे प्रेत हे पूर्ण कुंजलेले असल्यामुळे तेथे फक्त हाडांचा सापळा बाकी होता.
त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी अनोळखी प्रेताचे नमुने घेऊन घटनेचा पंचनामा करून पंचांच्यासमक्ष तसेच वनकर्मचारी पत्रकार यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत हद्दीत ई क्लास जागेवर सदर अनोळखी वृद्धाचे प्रत नेउन तिथेच त्या अनोळखी वृद्धाचा अंत्यविधी करण्यात आला सदर जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला मर्ग दाखल करण्यात आला आहे मर्द क्रमांक 53/2021 कलम 174 जा.फौ. नुसार दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक वावगे हे करीत आहेत.