कृषी महाविद्यालय अकोला येथे दोन दिवशीय दि. २५ व २६ जून २०२१ आभासी पद्धतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ. एम.बी. नागदेवे अधिष्ठाता (कृषी) डॉ. पं.दे. कृ.वी. अकोला व डॉ. एस एस. माने सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अकोला हे होते. या प्रसंगी मा. डॉ.विलास भाले सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सदर आभासी पद्धतीने स्नेहसंमेलन घेत असल्यामुळे कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी व प्राध्यापक वृंदाचे अभिनंदन केले. कृषी महाविद्यालय अकोला हे एकमेव महाविद्यालय आहे की जे या कोरोणा महामारीच्या परिस्तिथी मध्ये सुद्धा सदर कार्यक्रमाचे आभासी पद्धतीने आयोजन केले. विद्यार्थ्यांनी वातावरणाच्या बदलानुसार स्वतः बदल करून नवीन बदल स्वीकारला पाहिजे असे आवाहन डॉ.विलास भाले सर यांनी केले. तसेच या प्रसंगी मा. अधिष्ठाता (कृषी) डॉ. एम. बी. नागदेवे सर व मा. डॉ. एस. एस.माने सर सहयोगी अधिष्ठाता कृ. म. वि.अकोला यांनी आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. पी.लांबे , प्रमुख विस्तार शिक्षण शाखा यांनी केले या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाचे विद्यार्थी अभिषेक पाटील व शितल इंगळे यांनी केले तर स्वागत गीत तृतीय वर्षाची विद्यार्थिनी वैशाली शेळके हिने सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच गौरी पिंजरकर हिने सुंदर असे नृत्य सादर केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शलाका महल्ले हिने केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुणाल अपार, भूषण खवले, वेदांग देशपांडे, ऋतुजा जुमनाके, तुषार खांडेकर, आदित्य कानडे, गोपाल उगले यांनी परिश्रम घेतले. आज दिनांक २५ जून रोजी विविध स्पर्धांचे आभासी पद्धतीने आयोजन करण्यात आले होते या मध्ये वक्तृत्व स्पर्धा (१८ विद्यार्थी) , वादविवाद स्पर्धा (१२ विद्यार्थी) , उत्स्फूर्त भाषण (११ विद्यार्थी), निबंध स्पर्धा (३० विद्यार्थी), फोटोग्राफी (३८ विद्यार्थी), बुद्धिबळ (३५ विद्यार्थी) स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते