घराच्या झाडाझडतीमध्ये ११ तलवारी ५ फायटर आढळले ; नांदुरा येथे एलसीबीने केला मोठा शस्त्रसाठा जप्त,दोघे आरोपी ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथक व नांदुरा पोलिसांची संयुक्तिक मोठी कारवाई…
जिल्ह्यात अवैध शस्त्र साठा सामाजिक सुरक्षिततेचा भंग करीत असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचून शांतता भंग करीत असते. त्यामुळे अवैध शास्त्र साठा जप्तीचे मोठे आवाहन स्थानिक गुन्हा शाखेवर असून त्याच दृष्टीने बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा पथक हाय अलर्ट मोडवर काम करताना दिसत आहे. नांदुरा शहरातही अवैध शस्त्रसाठा स्थानिक गुन्हे शाखेच्या बुलडाणा पथकाने जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखा बुलडाणा पथकास नांदुरा मध्ये घरांमध्ये अवैध शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीवरून एलसीबी चे प्रमुख बळीराम गीते यांनी पथकासह नांदुरा येथे छापा मारला. यावेळी पोलिसांना घरांमध्ये ११ तलवारी व ५ फायटर आढळून आले सदर शस्त्रसाठा जप्त करून दोघांना एलसीबी बुलडाणा पथकाने ताब्यात घेतले आहे.
सदर कार्यवाही १८ जुलै रोजी करण्यात आली या कारवाईने नांदुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकास नांदुरा शहरात अवैधरित्या शस्त्र साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीवरून एलसीबी पथक प्रमुख बळीराम गिते यांनी १८ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास नांदुरा येथे जाऊन सागर श्रीकृष्ण देवकर वय २४ रा.मोतीपुरा नांदुरा व निलेश सुरेश डवले वय ३५ रा. वार्ड क्रमांक- २ नांदुरा यांच्या घरी छापा मारला असता निलेश डवले यांच्या घरात तब्बल (१०) दहा तलवारी व ( ५ ) पाच फायटर मिळून आले. घटनेचा अधिक तपास व कसून चौकशी केली असता मोतीपुरा नांदुरा येथील रहिवासी सागर श्रीकृष्ण देवकर याच्या घरी पोलिसांनी झाडाझडती घेतली असता एक तलवार आढळून आली.
अवैध शस्त्रसाठा जप्ती या कारवाईने नांदुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे या अंतर्गत अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले असून अवैध शस्त्रसाठा हे सामाजिक शांतता व कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचत असते. सदर कारवाईने नांदुरा शहरासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे…
एलसीबी पथकाने दोघांना ताब्यात घेऊन अकरा तलवारी व पाच फायटरसह अवैध शस्त्रसाठा जप्त करून दोघांनाही अटक केली आहे. याप्रकरणी सागर देवकर व निलेश डवले विरुद्ध नांदुरा पोलिस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक यमराज सिंग राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, पोहेकॉ श्रीकृष्ण चांदुरकर, पो. ना. गजानन गोरले, सतीश जाधव व चालक पो.कॉ. मधुकर रगड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.