पेट्रोल ,गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जळगाव जामोद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन…
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी – सन २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण दिलेल्या घोषणे मध्ये आपन तमाम भारतीय जनतेला आश्वासन दिले होते की,आघाडी शासनामधल्या वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या किमतीच्या विरोधात आपण प्रचंड आंदोलन केले व वाढत्या किमती आम्ही कमी करून दाखवू असे आश्वासन दिले. परंतु कमी करणे तर दुरच उलटपक्षी आपल्या कारकिर्दी मध्ये ऐतिहासिक अशी वाढ झालेली आहे याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचे वाढलेले दर त्वरित कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मोटर सायकलची अंतयात्रा काढण्यात आली. व मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल, तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत दाभाड़े, प्रकाश ढोकने,अँड.संदिप उगले,एम.डी.साबीर,रंगाराव देशमुख, रमेश उमाळे,विश्वास पाटिल,अजहर देशमुख,एजाज देशमुख, अब्दुल जहीर,पराग अवचार,ईरफान खान, आशिष वायझोड़े, अताउल्लाह पठान, सिद्धू हेलोडे, संजय देशमुख,महिला तालुकाध्यक्ष वर्षाताई वाघ, पुष्पाताई वायझोड़े, सुहास वाघ, योगेश कुंवर, बंटी शंकपाल सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.