
चिखली – भाजपाची सत्ता असलेल्या चिखली नगर पालीकेमध्ये अर्धवट विकास कामे करुन पुर्ण कामाचे देयक काढून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत पाटील यांनी तहसिलदार चिखली यांचेकडे एका निवेदनाव्दार केली आहे. दि.24 जून रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात संकेत पाटील यांनी नमुद केले आहे की , भाजपाची सत्ता असलेल्या चिखली नगर पालीकेमध्ये मागील काही दिवसांपासून न.प. मुख्याधिकारी , ठेकेदार व अभियंते यांनी अर्धवट विकास कामे करुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात त्याप्रकरणी त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या आरोपांची निष्पक्षपणे चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून यासंदर्भात आगामी 8 दिवसात कारवाई न झाल्यास तिव्रं स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही शेवटी देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रतिलीपी मा. राजेंद्रजी शिंगणे , पालकमंत्री बुलडाणा व जिल्हाधिकारी बुलडाणा यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी निवेदन देतांना विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, विधानसभा सरचिटणीस प्रशांतभैया डोंगरदिवे, जिल्हा अध्यक्ष युवक शेखर बोंद्रे ,शहर उपाध्यक्ष सदानंद मोरगंजे ,दत्ता खत्री, अभिजीत शेळके, शुभम तांगडे, अतुल पाटील,राजू डोंगरदिवे, लखन अवसारे,सौरभ खंडागळेआदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.