बुलढाणा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतीच राष्ट्रवादी कृषी पदवीधर विभागाची (सेलची) स्थापना केली असून त्या विभागाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन येत्या १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी अमरावती येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. या अधिवेशनासाठी श्री. राजीवजी जावळे, जिल्हाध्यक्ष किसान सभा बुलडाणा यांची कृषी पदवीधर संघटनेचे जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून केलेल्या निवडीबद्दल श्री. राजीवजी जावळे यांनी मा.आ.डॉ.श्री. राजेंद्र शिंगणे साहेब, राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश. ,राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेचे विदर्भ समन्वयक श्री.सुधीरजी राऊत, यवतमाळ , जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांचे आभार मानले .