सिंदखेड राजा – दिनांक: १७/०२/२०२२ रोजी जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेडराजा जि.बुलडाणा या लखुजीराव राजे जाधव यांचे राजवड्यासमोर पेन्डॉल टाकून पक्षाची प्राथमिक, क्रियाशील सभासद नोंदणी करण्यात आली आहे. पक्षाचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिकांकडून नोंदणी अभियानास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.यावेळी समाज माध्यमांशी बोलतांना जिल्हयात लक्षणीय सभासद नोंदणी होईल असा विश्वास व्यक्त केला. जिल्हाभर पदाधिकारी, कार्यकर्ते यासाठी प्रयत्नशील आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सभापती, प. स, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, माजी सभापती, माजी नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विरकी संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, युवक शहराध्यक्ष, समता परिषदेचे पदाधिकारी, पक्षाचे सोशल मीडिया व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.