सिंदखेड राजा प्रतिनिधी – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या नावाची घोषणा करण्यात आली . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्ष , तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या नावाची घोषणा जिल्हा प्रभारी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी यांनी घोषित केली आहे. नावाची घोषणा करण्यापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका निरीक्षक यांनी त्या-त्या तालुक्यात जाऊन पक्षाची बैठक घेऊन इच्छुकांची नावे घेतली होती त्यानंतर जिल्हा पक्ष कार्यालय बुलढाणा येथे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे प्रमुख उपस्थितीत निवड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती .
बैठकीत जिल्ह्यातील पक्षाचे माजी आमदार , माजी खासदार ,माजी मंत्री ,माजी जिल्हाध्यक्ष ,प्रदेश पदाधिकारी ,जिल्हाध्यक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित होते सदर बैठकीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन संघटनात्मक बदल करणे अपेक्षित होते त्या अनुषंगाने पक्षाने काही पदाधिकारी कायम ठेवून इतर पदाधिकाऱ्यांना शासकीय समिती स्थान दिले असून जिल्हा कार्यकारणी त्यांचे नावाचा विचार करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष यांनी कळविले आहे जिल्हा कार्यकारणी आणि विभाग या ठिकाणी लवकरच बदल होणार असल्याचे संकेत एडवोकेट नाझेर काझी यांनी दिले आहे.
नव्याने नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी यांची नावे खालील प्रमाणे आहे विधानसभाध्यक्ष – (मलकापूर) संतोष रायपुरे (जळगाव जामोद) प्रकाश ढोकणे (खामगाव )पुंजाजी टिकार (बुलढाणा )नरेश शेळके (चिखली) प्रमोद पाटील (मेहकर) पुरुषोत्तम पडघान (सिंदखेड राजा )गजानन पवार.
तालुका अध्यक्ष – रामराव आत्माराम लवकर ऊर्फ बाळू पाटील (मलकापुर) संजय चोपडे अध्यक्ष (नांदुरा) विनायक मोरे कार्याध्यक्ष ( नांदुरा )प्रमोद सपकाळ अध्यक्ष (जळगाव जामोद) महादेव श्रीराम भालतडक कार्याध्यक्ष (जळगाव जामोद) संजय मारोडे अध्यक्ष (संग्रामपूर )अरुण निंबाळकर कार्याध्यक्ष (संग्रामपूर )संजय गवांदे अध्यक्ष (शेगाव) राजू पाटील कार्याध्यक्ष (शेगाव) दीपक मस्के (चिखली )प्राध्यापक डीएम लहाने (बुलढाणा )यशवंत धावे (मोताळा )दत्तात्रय घनवट अध्यक्ष (मेहकर )या शिंदे कार्याध्यक्ष (मेहकर ) सदानंद तेजनकर (लोणार) सतीश काळे (सिंदखेडराजा) प्राध्यापक उद्धवराव म्हस्के अध्यक्ष (देऊळगाव राजा )नितीन शिंगणे कार्याध्यक्ष (देऊळगाव राजा ) अंबादास सिंगी पाटील (खामगाव).
शहराध्यक्ष – अरुण अग्रवाल (मलकापूर) नितीन मानकर अध्यक्ष (नांदुरा) कलीम परवेज कार्याध्यक्ष (नांदुरा) शहर देशमुख अध्यक्ष (जळगाव जामोद )लक्ष्मण ढगे कार्याध्यक्ष (जळगाव जामोद) तुकाराम घाटे अध्यक्ष (संग्रामपूर) शेख सरदार शेख शेखजी कार्याध्यक्ष (संग्रामपूर) दिनेश साळुंके (शेगाव )रामेश्वर ताकोते (शेगाव) देवेंद्र देशमुख अध्यक्ष (खामगाव )मोहम्मद आरिफ कार्याध्यक्ष (खामगाव )रवींद्र तोडकर अध्यक्ष (चिखली) रहीम खान पठाण कार्याध्यक्ष (चिखली )अनिल बावस्कर (बुलढाणा )प्रमोद कळसकर (मोताळा) निसार अन्सारी मेकर तोपिकली (लोणार) सीताराम चौधरी (सिंदखेडराजा) अर्पित मिनासे (देऊळगाव राजा )सय्यद करीम कार्याध्यक्ष (देऊळगाव राजा )