देऊळगाव राजा – माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताह च्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा देऊळगाव राजा तालुका जिल्हा बुलडाणा च्या वतीने आज दिनांक ,६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मंडपगाव येथे श्री संजय देशमुख यांच्या ड्रॅगन फ्रुट च्या मळ्यात शेतकरी मेळावा व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
जिल्हा परिषद चे बांधकाम सभापती रियाज खॉ पठाण यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस किसानसभेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष, राजु सिरसाठ, विधानसभा अध्यक्ष गजानन पवार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष झोटे सर, माजी सभापती पती राजु चित्ते, विद्यमान प.स. सभापती गजेंद्र शिंगणे, किसानसभा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गिते, चिखली तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम हाडे, सतीश पाटील भुतेकर, देशमुख सर यांच्या उपस्थितीत हे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाला.
याप्रसंगी राजु सिरसाठ यांनी प्रास्ताविक केले, संजय देशमुख यांनी ड्रॅगन फ्रुट या नाविन्यपूर्ण पिकाविषयी मार्गदर्शन केले, रावसाहेब पाटील यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून फळबाग, दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन यांचा आर्थिक ताळेबंद मांडला.
किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळे यांनी बिजोत्पादन आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती करण्याच्या पद्धती आणि फायदे याविषयी बोलतांना शरदचंद्र पवार साहेबांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीचे प्रयोग करून पश्चिम महाराष्ट्रातील शेती विकसित करून शेतकरी अर्थ समृद्ध केले तेच विचार आपण आचरणात आणून आपली ही आर्थिक उन्नती साधली पाहिजेत असा विचार व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात रियाज खॉ पठाण यांनी महाआघाडी सरकारच्या ध्येय धोरणांवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष संदिप पाटील गाढवे यांनी केले होते. परिसरातील अनेक शेतकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.या शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे सुत्रसंचलन एस डी देशमुख सर यांनी तर आभारप्रदर्शन संदिप पाटील गाढवे यांनी केले.