राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने निवेदन देऊन केला रासायनिक खते व इतर भाववाढिचा केंद्र सरकारचा केला निषेध
गजानन सोनटक्के जळगाव जा
:-देशामध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज बेसुमार वाढत असून पेट्रोलने देशात शंभरी पार केली आहे.त्यातच केंद्रातील सध्याच्या भाजपा सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत बेसुमार वाढ करून देशातील शेतकऱ्यांना दुसरा मोठा धक्का देण्याचे काम केले आहे.
केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या १०:२६:२६ ची किंमत प्रति बॅग ६०० रूपयांनी तर डीएपी ची किंमत प्रति बॅग ७१५ रूपयांनी वाढविली. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप सध्याच्या भाजपा केंद्र सरकारने केले आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिव्र शब्दात निषेध करीत आहे. ही दरवाढ केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिव्र आंदोलन करेल याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती. निवेदनावर तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत दाभाडे, जेष्ठ नेते रंगराव देशमुख,शहर अध्यक्ष अब्दुल जहिर,एम डि साबिर, एजाज देशमुख,शेख जावेद,संजय दंडे,शेख बबलु, संदिप ढगे, अब्दुल हमिद यांच्यासह इतर कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत