नाशिक – मुख्यमंत्र्यांबात द्वेशभाव, बदनामी निर्माण करणारी वक्तव्ये केल्याने नारायण राणे यांना नाशिक पोलिसांनी अटक करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूनकडे गेल्याचेही समजते. नाशिक पोलिस आयुक्तांनी याबाबत आदेश दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांना अटक करून कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.