गजानन सोनटक्के जळगाव जा . – नांदुरा तालुक्यातील निमगाव ला लागुन असलेल्या नारायनपुर येथे पतिने पत्नी चा खुन केला हि घटना २८ मे.रोजि संध्याकाळचे ६चे सूमारास घडली वर्षा विष्णू खैरे वय ३१ असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. वर्षा विष्णू खैरे हिस तिच्या राहते घरात पतीने जड वस्तू डोक्यावर मारून खून केला.
आरोपी विष्णू खैरे वय ३५ वर्ष आहे त्याना आठ वर्षे वयाचा मुलगा. सहा वर्षे वयाचा मुलगा. चार.वर्षे चा मुलगा व.दहा महिन्याची मूलगि आहे या घटने मुळे गावात व परिसरात धक्का बसला आहे घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मयत महिलेचे प्रेत उत्तरीय तपासणी करिता पाठवले . पुढील तपास नांदुरा पोलीस करित असून अद्याप वृत्त लिहेपर्यंत खुनाचे कारण समोर आले नव्हतें .