हिवरखेड पूर्णा – हिवरखेड पूर्णा ह्या गावातील विद्युत समस्येकरिता सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच संपूर्ण गावकरी हिवरखेड पूर्णा यांच्यातर्फे माननीय उपविभागीय अभियंता उपविभाग सिंदखेड राजा (विद्युत )जिल्हा बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले उपरोक्त निवेदनात असे म्हणण्यात आले की मौजे हिवरखेड पूर्णा येथील साधारणता दोन महिन्यापासून डीपी जळालेली असून त्यामुळे गाव डीपीच्या कारणामुळे अंधारात आहे मध्यंतरीच्या काळात डीपी बदललेल्या ही अर्धवट दुरुस्त असल्यामुळे वारंवार मूळ समस्या कायम राहिली आहे . गावांमधील संपूर्ण वायरिंग हे ढिली झाली असून की वायरिंग जोडणे गरजेचे आहे .
साधारण वर्षापासून काही विद्युत पोल हे विना वायरिंग चे असल्यामुळे त्यावर ती वायरिंग व्यवस्था करणे , गावांमध्ये ३ व ४ या वायरिंगची व्यवस्था करणे साधारणता चार वर्षापासून गावांमध्ये तीन चा डीपी चे आश्वासन दिले जात आहे मात्र संबंधित डीपी चे काम पूर्ण करण्यास कोणता मुहूर्त शोधावा लागतो हे समजण्यास येत नाही. वरील संबंधित समस्या बाबत विद्युत कार्यालयाकडे वारंवार तक्रार देऊन हे कार्यालय झोपेतून जागे केल्याचे काम गावकऱ्यांना व ग्रामपंचायतीने केले आहे ह्या सर्व समस्या बाबत कार्यालयाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा कोणताही बदल झालेला पहावयास मिळत नाही .
म्हणून गावकऱ्यांचा / जनतेचा रोष अनावर झाल्यामुळे या कारणास्तव आपल्या हलगर्जीपणा च्या चेहरा समाजासमोर यावा म्हणून आम्ही कार्यालयात मोर्चाचा मार्ग गावकरी मंडळींनी अवलंबून राहिला आहे सदर निवेदन वरती सुनील गोरे सरपंच ,संतोष नागरे ,दामोदर आनंदा गजानन अर्जुन कुटे , नारायण वीर, भानुदास कुटे ,गजानन नागरे ,राजमाने ,गणेश कुटे ,बाबासाहेब कुटे , संतोष नागरे, सुदर्शन नागरे, रवींद्र कुटे ,शिवानंद कुटे , शिवहरी कराड ,रमेश वाघ ,अमोल नागरे ,ज्ञानेश्वर नागरे ,शुभम नागरे ,सचिन नागरे ,अमोल कुटे , जनार्धन कुटे , सर्जेराव गायकवाड, गंगाधर भुसारी, चेतन कुटे ,प्रमोद नागरे ,विलास धोंगडे, योगेश नागरे, गणेश नागरे, गजानन नागरे, गजानन कुटे ,संदिप नागरे, यांच्या सह्या आहेत.