शेगांव – कोविड काळात राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहे . त्यात लहान लहान प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुध्दा भरडल्या जात आहे . अस्या संस्था चालकांना मागील २ वर्षापासुन आपले कुटूंब चालवीणे कठीत झाले असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे किंवा आली आहे . राज्य शासनाचा शैक्षणिक क्षेत्र म्हणजे १० वी , १२ वी किंवा कॉलेज इतकेच मार्यादीत करून ठेवले आहे . परंतु या सोबत विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबत लहान लहान संगणक , टायपिंग , शिलाई मशीन , डॅन्स , चित्रकला इत्यादी प्रशिक्षण हे अल्प काळाचे म्हणजे ३ ते ६ महिण्याचे असतात व साधारण अस्या प्रशिक्षण संस्थेंत जवळपास दिवसभरात १०० पेक्षा जास्त विद्यार्थी नसतात .
प्रत्येक प्रशिक्षणाचा दिवसभराचा कालावधी ४५ ते ६० मिनीटाचा असतो . दिवसभराचा काळावधीत ८ ते ९ बॅचेच होतात म्हणजे प्रत्येक बॅच मधे ८ ते १० मुले असतात . या विद्याथ्यर्थ्यांना सोसल अतर ठेवुन प्रशिक्षण देते प्रत्येकाला शक्य असते . असे प्रशिक्षण देणा – या शासन मान्य संस्था प्रत्येक गावांत १० ते १५ संस्था असतात . यांना जर करोना काळात प्रशिक्षण देण्याची परवांगी मिळाल्यास त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुडेल व विद्यार्थी वर्गात सुध्दा चैत्यन्य निर्माण होइल व रिकाम्या वेळेत परील प्रशिक्षण पुर्ण करू शकेल . मागील वेळेस अस्या प्रशिक्षण देणाऱ्या संगणक टंकलेखन संस्थानां महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद , पुणे यांनी करोना काळातील शर्टी व अटी घालुन स्थानीक प्रशासनाच्या परवांगीने सुरू करण्यास दिली होती .
अस्या अभ्यासक्रमाला महाराष्ट्रील सर्वच मा . जिल्हाधिकारी कडून परवांगी मिळाली होती . त्यानुसार विद्यार्थांच्या मार्च २०२१ मधे जवळपास दिड ते २ लाख विद्याथ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या . त्यांचा निकाल सुध्दा लीगलेला आहे . संघटनेच्या माहिती नुसार ३५०० प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत विषार्थी किंवा संस्था चालक हे करोना बाधीत झाले नाही . तरी मा . मुख्यमंत्री , मा . शिक्षणमंत्री व मा . जिल्हाधिकारी यांनी वरील मागणीचा विचार करावा असे निवेदन एमएससीआय , मुंबई या संघटनेचे सहसचिव अरूण चांडक यांनी मागणी केली आहे .