मनसेचे जेष्ठ नेते माजी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त कोवीड सेंटर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
नांदुरा – : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष मा. श्रीकृष्ण भाऊ सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा येथील नवीन बांधकाम चालू असलेल्या सरकारी दवाखान्यामध्ये(कोवीड केअर सेंटरमध्ये) मा.श्रीकृष्ण भाऊ सपकाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव राहुल चोपडे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवचरण पारस्कार, शुभराज डंबेलकर, शिवशंकर ढोकणे, सौरभ पोलाखरे, सौरभ तायडे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.