सिंदखेडराजा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त मातृतिर्थ सिंदखेडराजा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिकांनी आजच्या काळात संकट म्हणून आलेल्या कोरोना या महामारी ची लागण झालेल्या रुग्णना सिंदखेड राजा येथील कोव्हिडं सेंटर मध्ये जाऊन आपुलकीने तब्बेतीची विचारना करून अंडे व फळ वाटप केले.
कोव्हिडं सेंटर मधील अधिकारी यांना सुद्धा तब्बेतीची विचारपूस करून त्यांना फळ अंडी दिले व त्यांचे कोतुक सुद्धा केले यावेळी शिवाभाऊ पुरंदरे ,अतिष राजे, निलेश देव्हरे, अभी दादा देशमुख, शुभम पव्हरे, महेंद्र पवार, विजय भागीले, पवन राजे ,अंकुश चव्हाण , इतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.