प्रतिनिधी (सचिन मांटे) – सिंदखेड राजा तालुक्यात मिशन कवचकुंडल मोहिमेस सुरुवात दिनांक ८/१०/२०२१पासून सिंदखेड राजा तालुक्यात मिशन कवच-कुंडल मोहिमेस सुरुवात झाली आहे सदर मोहीम ही दिनांक १४/१०/२०२१ पर्यंत राबविण्यात येणार असून यामध्ये लसीकरणाला एक हि लस न घेतलेल्या १८ वर्षापर्यंत सर्वांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे .
अशी माहिती आरोग्यमंत्री यांचे उद्दिष्ट १ लाख ५१ हजार ७६७ असून आतापर्यंत ६३ हजार ८२३ साधारणपणे व्यक्तींचा पहिला डोस घेतलेला आहे उर्वरित १८ वर्षावरील सर्वांनी covid-19 हा मिशन कवचकुंडल मोहिमेला सहभाग घेण्याचे आव्हान अप्पर जिल्हाधिकारी घोंगटे व डॉक्टर महेंद्र कुमार साळवे यांनी केले सदर मोहिमेला तालुक्यात सुरुवात झाली असून सिंदखेड राजा तालुक्यांमध्ये १४ ठिकाणी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले.
दुपारी तीन वाजेपर्यंत ७०३ लसीकरण करण्यात आले सदर मोहिमेत आज अप्पर जिल्हाधिकारी घोंगटे,तहसीलदार सुनील सावंत,गट विकास अधिकारी वेणीकर,विस्तार अधिकारी पवार,मंडळअधिकारी घुगे यांनी आरोग्यवर्धनी सेवा केंद्र किनगाव राजा, राहेरी बुद्रुक येथे भेट दिली व उर्वरित मिशन काम करून देण्याचे आव्हान केले