उच्चपदावर पोहोचूनही तोडली नाही शेतीशी नाळ कोनडच्या शेतकरीपुत्राचा ग्रामस्थांना अभिमान
चिखली – उच्चपदाची खुर्ची मिळाली की शक्यतो शेतीशी अन् मातीशी नाळ तुटली जाते. पूर्वी शेतीत राबणारे अधिकारी झाले की कामाची लाज बाळगतात. मात्र, कोनडचे भूमिपुत्र, शेतकरीपुत्र डॉ. शरद जावळे यांनी पदाचा कोणताही गर्व ठेवला नाही. सध्या यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. गावी कोनडला त्यांनी शेतीत केसर आंब्याची बाग फुलवली असून, यंदा चांगल्याच कैऱ्या झाडांना लगडल्या. पिकलेल्या आंब्यांना व्यापारी पडून भाव मागू लागल्याने जावळे यांनी स्वतःच आंबे विकले. व्यापाऱ्यांना थारा न देता कुटुंबीयांच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यंत तब्बल टनभर आंबे पोहोचून त्यांनी स्वकमाई केली.
शेतीशी नाळ कायम जोडून ठेवणाऱ्या या अधिकाऱ्याची सर्वत्र कौतुकास्पद कोनड खुर्द येथील शेतकरीपुत्र तथा यवतमाळचे उपजिल्हाधिकारी असलेले डॉ. शरद जावळे यांनी समाजाला एक आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर जावळे हे हाडाचे शेतकरी असून सोयाबीन व तूर या पिकांना पर्याय म्हणून त्यांनी दोन एकरांत १४ बाय ७ वर या आकारात ८७० केसर आंब्याची लागवड केली. यावर्षीच उत्पादन घेण्यात आले.
आंबा विकण्यासाठी व्यापाऱ्यांशी वडिलांची चिंता पाहून केला निर्धार – व्यापारी नकारार्थी वागत असल्याने त्यांचे वडील ज्ञानेश्वर जावळे चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे मालाचा दर्जा व गुणवत्ता चांगली असेल व थोडा मार्केटचा • अभ्यास केल्यास आपणही स्वतः आंबा विकू, असा निर्धार शरद जावळे यांनी केला .डॉ. जावळे यांनी घेतला. योग्य पॅकिंग करून आंबे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात आले. केसर आंब्याला मागणी वाढल्याने ऑर्डरही पटापट आल्या. काही दिवसांतच कुटुंबीयांच्या मदतीने एक टनावर आंबा विक्री करण्यात आला.
कामाची कसली आली लाज ?
आई, वडील व पत्नीला आंबे विक्रीचा निर्णय सांगितला असता ‘तु ज्या पदावर नोकरी करतोस, ते तुला शोभणार नाही, लोक नावे ठेवतील’ असे सर्वजण म्हणाले. शेतकरीपुत्राने त्यात काय लाज बाळगायची म्हणत डॉ. शरद जावळे आंबे विक्रीसाठी पुढे आले. आत्मविश्वासाने काम केल्यास शेतीतून मोठी आर्थिक प्रगती साधता येऊ शकते, असा संदेश डॉ. जावळे यांनी दिला आहे.