सिंदखेडराजा मतदार संघातील कोरोना रुग्णांची अडचण लक्षात घेवून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा येथील को विड रुग्णालय मंजूर केले असून येत्या आठ दिवसांत हे रुग्णालय कार्यान्वित होणार आहे.
जालना,औरंगाबाद येथील सरकारी व खासगी रुग्णालयात सिंदखेडराजा मतदार संघातील रुग्णांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाईकांचे हाल होत होते तर खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागत होता.ही अडचण लक्षात घेवून डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मागील काही दिवसांपूर्वी या बाबत आढावा बैठक घेवून तत्काळ को विड रुग्णालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.पुढील आठ दिवसात रुग्णालय सुरू होणार असल्याने लोकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.मंगेश खुरपे
जिल्हाउपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस,बुलढाणा(सिंडखेड राजा) यांनी हि माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली .
