जळगाव जामोद गजानन सोनटक्के – ऑक्टोबर महिन्यापासून 8 ते 12 व एक डिसेंबरपासून वर्ग एक ते सातची शाळा कोरोनानंतर सुरू झाली . परंतु ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी परिवहन व्यवस्था शिक्षणामध्ये आडकाठी बनू पाहात आहे हे लक्षात घेता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषता मुलींसाठी मानव विकास मिशन ची बस सेवा सुरू करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी पालक संघटना जळगाव जामोद यांनी आगार व्यवस्थापक जळगाव जामोद यांच्याकडे केली.
दिनांक 11 डिसेंबर 2021 ला पालक संघटना जळगाव जामोद यांनी आगार व्यवस्थापक यांची भेट घेतली . विद्यार्थ्यांच्या पालकांना विनाकारण आर्थिक भार पडत आहे, मुलींना खाजगी वाहतुकीमुळे अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे ,अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडत आहे यांची जाणीव करून देत उपलब्ध कर्मचाऱ्यांचा वापर करत फक्त मानव विकास मिशन ची बस सेवा सुरू करण्यासंदर्भात आगार व्यवस्थापक जळगाव जामोद यांच्याशी चर्चा करण्यात आली. चर्चेत पालक संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, उपाध्यक्ष अर्शद इकबाल, श्री प्रशांत तायडे, सचिव श्री अनिल भगत, विधी सल्लागार श्री. अमर पचपोर,प्रसिद्धी प्रमुख श्री. राजीव वाढे, संघटक सर्वश्री. अजय पलन, श्याम पाटील, जितेश पलन, गजानन भगत उपस्थित होते.