शेलगाव देशमुख,विष्णु आखरे पाटील – मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख मंडळाचे मंडळाधिकारी जयदेव येऊल यांची प्रशासकीय बदली सुलतानपूर येथे झाली तर मेहकर मंडळाचे मंडळाधिकारी आर.जे.चनखोरे हे प्रशासकीय बदलीवर शेलगाव देशमुख मंडळात आले यावेळी दोन्ही मंडळ अधिकारी यांचा एकाच वेळी निरोप समारंभ व स्वागत समारंभ करण्यात आला
शेलगाव देशमुख मंडळाचे मंडळाधिकारी जयदेव येऊल गेल्या आठ-दहा वर्षांपासून या मंडळांमध्ये कार्यरत होते शेलगाव देशमुख मंडळातील चार ते पाच गावातील महसुलचा संपूर्ण कारभार पाहण्याची जबाबदारी मंडळाधिकारी जयदेव येऊल यांनी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली आपल्या कारकिर्दीमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेले मंडळाधिकारी जयदेव येऊल व नविन रुजू झालेले मंडळाधिकारी आर.जे.चनखोरे यांचा तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतीचे सदस्य दिलीप आखरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख, तलाठी अशोक शेजुळे, बालाजी तिरके, संदीप पवार, शिवलाल राठोड,माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद गोरे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप आखरे,लिपिक महादेव कड्डक, ग्राम रोजगार सेवक विष्णु आखरे पाटील, विवेक म्हस्के, कोतवाल किशोर पातुरकर,भगवान बघे, संगणक चालक विलास काळदाते सह शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप आखरे यांच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते