गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे महावितरण विभागाच्या उमापूर सब डिव्हिजन मधून सुनगाव ला विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मागील जुन महिन्यातच महावितरणने ट्रि कटिंग च्या नावावर चार दिवस सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुनगाव चा विद्युत पुरवठा बंद ठेवला होता. परंतु दिनांक नऊ जुलै रोजी पुन्हा ट्रि कटिंग च्या नावावर सकाळी सात वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित केला. सदर महावितरण जळगाव जामोद विभाग सुनगाव येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडित ठेवून त्रास देत आहे तसेच नागरिकांनी बिल भरले नाही तर नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडित करतात. गेले किती महिन्यापासून सुनगाव येथील विद्युत पुरवठा हा उमापूर येथून 11 किलोमीटर अंतरावरुन चालू आहे. त्यातच उमापूर सब स्टेशन अंतर्गत तेथीलच रसलपुर व आदिवासी बहुल भागाला विद्युत पुरवठा केला जातो.
तेथील कोणत्याही खेडे गावचा पुरवठा खंडित झाल्यास तो सुरळीत होईपर्यंत सुनगाव येथील विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यातच महावितरण चे कर्मचारी सुनगाव येथील नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देतात. जाणीवपूर्वक विद्युत पुरवठा बंद ठेवतात तसेच महावितरणने मागील महिन्यात ट्रि कटिंग च्या नावावर लाखोचे बिल काढले परंतु ट्रि कटिंग व्यवस्थित केली नाही. असे नागरिकांमधून बोलल्या जात आहे.मागील महिन्यात ट्रि कटिंग केल्यानंतर एकाच महिन्यात झाडाच्या फांद्या 11 केव्हि सुनगांव ला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांना लागत आहेत काय?असा प्रश्न सुनगांव येथील नागरिक महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विचारत आहेत.कधी ट्री कटींग च्या नावावर तर कधी फॉल्ट च्या नावावर सुनगाव ची लाईन बंद केल्याशिवाय महावितरणच्या अधिकाऱ्यांची शांती होत नाही दर महिन्याला ट्री कटिंग केल्यावर सुद्धा सुनगाव लाईनवर रोज तांत्रिक बिघाड होत असतो याला फक्त कारणीभूत सुनगाव च्या नागरिकांची सहनशीलता सुनगांव येथील नागरीकांची दररोज होणाऱ्या त्रासापासून कधी सुटका होईल याचे उत्तर महावितरण ने नागरिकांना द्यावे. व या गंभीर बाबीकडे स्थानिक नेत्यांनी लक्ष द्यावे.