ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप्स फेडरेशन च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून राजीव जावळे यांची निवड
चिखली – देशभरातील जवळपास पाच लाख स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप्स फेडरेशन च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील राजीव भगवानराव जावळे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये ऑल इंडिया फेयर प्राईज फेडरेशनच्या केंद्रीय समितीची बैठक बुलढाणा येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू तथा ऑल इंडिया फेरफाईज फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद भाई मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, जनरल सेक्रेटरी विश्वंभर बसू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकी च्या प्रोसिडिंग नुसार विश्वंभर बसू यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे राजीव जावळे यांची राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आल्याचे महाराष्ट्राच्या संघटनेला कळविले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने राजीव जावळे यांना सदर नियुक्तीपत्र देण्यात आले.
जवळपास पाच लाख स्वस्त धान्य दुकानदारांची प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेचे देशभर प्रत्येक राज्यात मोठे काम आहे.
राजीव जावळे यांच्या नेतृत्वकौशल्याने त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये नावलौकिक मिळवला. शिवाय आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने भारतभर फिरलेले असल्याने त्यांना संपूर्ण देशाच्या भौगोलिक अभ्यास आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असल्याने कलकत्ता येथील विश्वंभर बसू यांनी राजीव जावळे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत शिफारस केली व सदर शिफारशी ला महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पाठबळ दिल्याने राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांच्या उपस्थितीत राजीव जावळे यांना महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारणी वर घेण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
राजीव जावळे कृषी पदवीधर असून त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. दहा वर्ष संकरित बियाणे क्षेत्रामधील अनुभव आहे. तसेच चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी काम केलेले आहे याशिवाय
शिवशंभू अर्बन सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पदी काम करत असल्याने त्यांना कृषी, उद्योग व सहकार या तिन्ही क्षेत्रांत समृद्ध असा अनुभव आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष पदावर काम करत असल्याने त्यांचा संघटनेत काम करण्याचा अनुभव पाहता त्यांना या पदावर काम करतांना निश्चित फायदा होईल.
राजीव जावळे यांच्या नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री डी. एन. पाटील (औरंगाबाद), जनरल सेक्रेटरी कॉम्रेड चंद्रकांत पाटील (कोल्हापूर), प्रदेश उपाध्यक्ष राजेश आंबुसकर, बुलडाणा जिल्हा सचिव मोहन सेठ जाधव, कार्याध्यक्ष रंगरावबापु देशमुख, प्रसिद्धी प्रमुख विश्वास पाटील, सुनील बरडे, राजेश शेगोकार, रविंद्र महाले, उद्धवराव नांगरे, विनोदबापू देशमुख, भगवानराव कोकाटे, मनिकराव सावळे, निलेबापू देशमुख, निरंजन जिंतूरकर, आय एन खान तळेकर गुरुजी इत्यादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.