आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी कृषी मित्रांच्या समस्या मांडल्या विरोधीपक्ष नेते मा ना देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समोर
बुलढाणा जिल्ह्यातील कृषी मित्र आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांना भेटून त्यांच्या समस्यांचे निवेदन देण्यासाठी मुंबई येथे आले असता आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी सर्व कृषी मित्रांना सोबत घेऊन कृषी मित्रांच्या समस्या देवेंद्र फडणवीस आमदार त्यांचे समोर मांडून त्यांना निवेदन देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आग्रही मागणी त्यांच्याकडे केली आहे .
दि 21 /12 /2021 रोजी
बुलढाणा जिल्ह्यातील कृषी मित्र यांनी
कृषी मित्रांच्या नियमित असलेल्या नियुक्त्या कायम ठेवण्याबाबत.लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांना भेटून
महाराष्ट्र राज्य कृषी मित्र संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले . त्यावेळी विरोधी पक्षनेते ना देवेंद्र फडणवीस साहेब हे मिटींगसाठी येत असल्याने आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी सर्व कृषी मित्रांना सोबत घेऊन ना देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना कृषिमित्रांची भेट घालून देऊन त्यांना निवेदन दिले . तसेच कृषिमित्रांच्या जिव्हाळ्याच्या व हक्काच्या मागण्या सोडविण्याची विनंती केली .
कृषी मित्रांच्या निवेदनात म्हटले आहे की, कृषी मित्र गेल्या ५ ते ६ वर्षापासून कृषी मित्र म्हणून काम करीत आहोत. कृषी मित्र हा शेतकरी / कृषी विभाग / महसुल विभाग तथा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी काम करत असतो मात्र आत्मा नियामक मंडळाची सभा दि. १८/०८/२०२१ चे मंजूर इतिवृत्तानुसार बुलडाणा जिल्हयातील काही तालूक्यात कृषी मित्रांना नियुक्ती रद्द करण्याचे पत्र देण्यात आले, त्यामुळे त्या कृषी मित्रांवर अन्याय झाला. १) मा. संचालक, आत्मा कृषी आयुक्तालय पुणे यांचे पत्र, जा.क्र./ कृआ/सं. आत्मा/ शे.मित्र/मा.सु.२११ / २०२०,
दि. ०४/०३/२०२०
२) मा. आयुक्त कृषी, कृषी आयुक्तालय पुणे यांचे पत्र जा.क्र./कृआ/आत्मा/ SEWP/२०२१-२२/३५२/२१ दि. २५/०५/२०२१
वरील संदर्भ १ व २ नुसार कृषी मित्रांची संख्यासुद्धा निम्म्यावर करण्यात आली तसेच बरेचश्या जाचक अटी लावण्यात आल्या त्यातीलच एक अट अशी की, ग्रामपंचायतचा वेळोवळी ठराव मागणे व फेर नियुक्ती करणे याउलट ग्रामसभेच्या एकाच ठरावावरून ग्रामरोजगार सेवक / ग्रामपंचायत कर्मचारी / आशा वर्कर/पाणी पुरवठा कर्मचारी यांना कायम ठेवण्यात येते. वेळोवेळी ठरावासाठी राजकीय अथवा इतर अडचणी निर्माण होतात याचाच विरोध म्हणून आम्ही कृषी मित्र संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य तर्फे शासनाला वारंवार निवेदने दिली परंतू या सर्व गोष्टींचा शासन स्तरावर कोणतीही योग्य ती दखल घेण्यात आलेली नाही. तरी आपणांस विनंती की आमच्यावरील झालेल्या अन्यायाच्या अनुषंगाने आमच्या पुढील मागण्यांचा विचार करून न्याय देण्यात यावा, ही विनंती. अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा आंदोलनाचा इशारा सुद्धा शासनाला दिलेला आहे. व निवेदन कृषिमंत्री दादा भुसे विनायकराव मेटे आ गोपीचंद पडळकर यांना दिले आहेया वेळी कृषिमंत्री यांना समक्ष निवेदन देण्यास शुभम पाटील यांचे सहकार्य लाभले
कृषिमित्रांनी मानले आ सौ श्वेताताई महाले यांचे आभार
बुलढाणा जिल्ह्यातील कृषिमित्र आ सौ श्वेताताई महाले यांना भेटण्यासाठी आले होते .आ सौ श्वेताताई महाले यांनी त्यांची भेट ना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घालून दिली . त्यांच्या समस्या समोर ठेवल्या , ना फडणवीस साहेब यांनी त्यांच्या समस्या एकून घेतल्या त्याबद्दल सर्व कृषिमित्रांनी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांचे आभार मानले.
यावेळी निवेदन देणारे यांची नावे
कृषी मित्र संघर्ष समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत आव्हेकर उपाध्यक्ष मोहन सिंह राजपूत सचिव राधेश्याम जाधव बुलडाणा जिल्हा अध्यक्ष महेंद्र बोडखे ,,महेंद्र नारायणराव बोडखे ,गोपालभाऊ ठोकळ,गोपाल जगदेव फलके,श्रीकांत गजानन वेरुळकर,भागवत सुभाष ढाकरे ,दिपक विठोबा उगलमुले, विजय सिरसाट सोनार,धनराज श्रीराम धोरण ,आशीष मोखडे संग्रामपुर ,भागवत राताराम मारदेकर ,निलेश दशरथ सुरडकर यांच्या सह बुलढाणा जिल्ह्यातील कृषी मित्र हजर होते