Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तीक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी

  • योजनांच्या लाभासाठी https://ah.mahabms.com संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे
  • 18 डिसेंबर 2021 अर्ज करण्याची अंतिम मुदत

बुलडाणा, दि.3 : पशुसंवर्धन विभाग हा विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतीमान ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. त्याकरीता विविध वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी विभागाच्या माध्यमातून पशुपालक व शेतकऱ्यांसाठी करण्यात येते. त्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत शाश्वत अर्थाजनाचा पर्याय निर्माण करण्याचे काम विभाग करीत आहे. विभागाच्या वतीने वैयक्तीक लाभाच्या योजनांची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय योजनांमध्ये गत तीन वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे.

maha animal

    यासोबतच आता जिल्हास्तरीय विविध योजनांसाठीसुद्धा ऑनलाईन प्रणाली लागू करण्यात आली आहे.  यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली लाभार्थी प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शाश्वती वाढली असून त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे लाभ मिळण्याची शक्यता कळाल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.   वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी सन 2021-22 पासून https://ah.mahabms.com संकेतस्थळावर व AAH-MAHABMS या गुगल प्ले स्टोअरमधील ॲपवर  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. या पोर्टलवर पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन या पैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्यासची अंतिम मुदत 18 डिसेंबर 2021 आहे. योजनेचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर व मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे.

   अर्ज केवळ ऑनलाईनच स्वीकारण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यात आली असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागणार आहे. तसेच बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबतचा संदेश पाठविण्यात येणार असल्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वत:चे मोबाईल क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करावा. मोबाईल क्रमांक बदलू नये. योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1962 व 18002330418, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर यांनी केले आहे.

 या आहेत वैयक्तीक लाभाच्या योजना : नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेतंर्गत दुधाळ गायी, म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप व 25 अधिक 3 तलंगा गट वाटप करणे.

Leave A Reply

Your email address will not be published.