सिंदखेड राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक मधुकरराव गव्हाड यांचा तडकाफडकी राजीनामा
सिंदखेड राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक व इतर सदस्यांची महिनाभर अगोदरच निवड करण्यात आली होती परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्यप्रशासक मधुकरराव गव्हाड यांनी वैयक्तिक कारण देत जिल्ह्याचे उपनिबंधक यांच्याकडे तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे चर्चेला उधान आले आहेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून सिंदखेड राजा मतदारसंघात त्यांची ओळख आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष जिल्हा परिषद मध्ये सभापती या सह विविध पदावर त्यांनी काम केलेले आहेत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा एक मोठा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे अशा अचानक त्यांच्या राजीनामा देण्याच्या कारणामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे
सिंदखेड राजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक दिवसापासून मुख्यप्रशासक व संचालक दोन्ही पद गेल्या अनेक दिवसापासून रिक्त होते जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डाँ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत दोन महिने अगोदर कृषी उत्पन्न समिती चे संचालक व मुख्यप्रशासक निवड करून या कृषी उत्पन्न बाजार समितीला भरभराटीला आणण्यासाठी मुख्य प्रशासक म्हणून मधुकररावजी गव्हाड यांची निवड केली होती परंतु दोन महिन्यातच एवढे काय घडले की मुख्य प्रशासकाला राजीनामा द्यावा लागला यामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले आहेत
श्री मधुकर गव्हाड यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सदर राजीनाम्याची माहिती दिली या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश शेट खुरपे संचालक सिद्धार्थ जाधव संचालक आर आर आबा पाटील यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव समाधान शेळके प्रदीप ठाकूर