प्रतिनिधी रवींद्र सुरुशे – १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फासून २४ वर्षीय जेबीसी ऑपरेटरने पळवून. ही घटना ताडशिवणी (ता. सिंदखेड राजा) येथे काल, १४ जूनच्या रात्री घडली आहे.

पीर मोहम्मद छोटू (रा. पुरखास, ता कोसंबी, जि. संभल, उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. तो वर्षभरापासून ताडशिवणीत आला होता. गावातीलच एका जेसीबीवर तो ऑपरेटरचे काम करत होता. या दरम्यान त्याची ओळख पीडित अल्पवयीन मुलीशी झाली. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याने तिला पळवून नेण्याचा कट आखला.14 जून च्या रात्री त्याने तिच्या घरून पळवून नेले.
मुलीच्या लहान बहिणीस धमकी दिली की तू जर कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकीन.घडलेला प्रकार पीडितेच्या लहान बहिणीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी बिबी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पीर महोम्मद छोटू विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.