Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

महाराष्ट्रातील 10 खेळाडूंची टोकीयो ऑलिम्पिक साठी निवड ,खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी जागतिक दर्जाच्या लोणार सरोवर येथे सेल्फी पॉईंटची निर्मिती

बुलडाणा दि. 12 : ऑलिम्पिक टोकीयो-2020 चे आयोजन 23 जुलै ते 5 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार आहे.  महाराष्ट्राला अभिमान म्हणजे यावेळी 10 खेळाडूंची निवड टोकीयो ऑलिम्पिकसाठी झाली आहे.  त्यामुळे हा आनंदाचा क्षण साजरा करणे आवश्यक आहे.  ऑलिम्पिकचा कुंभमेळा म्हणजेच टोकीयो-2020 आशिया खंडात टोकीयो या शहरात दुसऱ्यांदा आयोजित होत आहे. एकाच शहरात दोनवेळा ऑलिम्पिक आयोजीत होणारे टोकीयो हे आशियाई खंडातील पहिलेच शहर आहे.  

lonar

     राज्यातील सहभागी खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन मिळण्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास, 23 जुलै 2021 टोकीयो ऑलिम्पिकचे औचित्य साधुन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतातील व राज्यतील सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे मार्गदर्शनात,  जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  यामध्ये प्रामुख्याने जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा आणि जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा, तालुका क्रीडा संकुल, मलकापूर, रेल्वे स्टेशन, मलकापूर इत्यादी ठिकाणी शुभेच्छा बॅनर, सेल्फी पॉईंट, स्टॅडी लावण्यात आलेले आहेत.

      जागतीक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर, पर्यटन स्थळ लोणार सरोवर परिसर व पंचायत समिती समोरील लोणार धार पॉईंट याठिकाणी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता प्रोत्साहन देण्यासाठी शुभेच्छा बॅनर व स्टॅडी तर क्रीडाप्रेमी नागरीकांसाठी सेल्फी पॉईंटची निर्मिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचेमार्फत करण्यात आली आहे.

  ऑलीम्पीकसाठी राज्यातील राही जिवन सरनोबत (शुटींग, कोल्हापूर) 25 मी. पीस्टल, महाराष्ट्र शासनात थेट नियुक्तीद्वारे उपजिल्हाधिकारी पदी नेमणुक, तेजस्वीनी सावंत (शुटींग, कोल्हापूर) 50 मी. थ्री रायफल, क्रीडा विभागात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन नेमणुक, अविनाश साबळे (ॲथलेटीक्स, बिड) 3000 मी. स्टीपलचेस, सेनादलामध्ये नायक सुभेदार पदी कार्यरत, प्रविण जाधव (तिरंदाजी, (आर्चरी) सातारा) रिकर्व्ह, सेनादलामध्ये नायक सुभेदार पदी कार्यरत, चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन, मुंबई) पुरुष दुहेरी, अ-श्रेणी अधिकारी, इंडीयन ऑईल, विष्णु सरवानन (सेलींग, मुंबई) लेजर स्टॅण्डर्ड क्लास, सेनादलामध्ये नायक सुभेदार पदी कार्यरत, उदयन माने (गोल्फ, महाराष्ट्र), सुयश नारायण जाधव (पॅरास्विमर, सोलापुर) 50 मी. बटरफ्लाय, 200 मी., महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्तीद्वारे अ श्रेणी क्रीडा मार्गदर्शक पदी नियुक्ती, भाग्यश्री जाधव (पॅराऑलिम्पिक, गोळाफेक, नांदेड), स्वरुप महावीर उन्हाळकर (पॅराशुटींग, कोल्हापूर) 10 मी.रायफल यांचा समावेश आहे.

           जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी नागरीक, क्रीडा मंडळे, संस्था, खेळाडू, एकविध खेळ क्रीडा संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक, विविध शासकीय / निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी ज्या ठिकाणी सेल्फी पॉईंटची निर्मिती केलेली आहे. त्याठिकाणी सेल्फी काढून व्हाट्सॲप, फेसबुक, ट्विटर, युट्युब च्या माध्यमातुन महाराष्ट्रातील खेळाडूंना शुभेच्छा प्रदान कराव्यात.  तसेच सहभागी महाराष्ट्रातील खेळाडूंनी अधिकाधिक मेडल्स भारतासाठी जिंकावेत अशी सर्व क्रीडाप्रेमींनी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा प्रदान कराव्यात.  लोणार सरोवर येथे भारतीय पुरातत्व विभागाचे श्री.भगत, विठ्ठल घारोड, सुरेश गुळवे, क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, विनोद गायकवाड, भिमराव पवार, क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत सेल्फी पॉईंटची निर्मिती केली आहे.     

   जिल्ह्यात खेळाचे वातावरण तयार होण्याकरीता सेल्फी पॉईंट, स्टँडी, शुभेच्छा बॅनर ची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी नागरीक, क्रीडा मंडळे, संस्था, खेळाडू, एकविध खेळ क्रीडा संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक, विविध शासकीय / निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी लाभ घेऊन शुभेच्छा प्रदान कराव्यात व खेळाडूंनी अधिकाधिक मेडल्स प्राप्त करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.