लोकजागरच्या प्रविण गितेची मुख्यमंत्री यांचे कडे मागणी!
सिंदखेड राजा – लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म 15 औगस्ट1922 ला झाला असून त्यांच्या जन्मांला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.वामनदादानी आपल्या साहित्याच्या व गाण्यांच्या माध्यमातून,बहुजन चळवळी ची परिवर्तनाची पताका आपल्या खांद्यावर घेत,आपल्या गीतांच्या माध्यमातून समाजाच्या मेंदूत विचारांची पेरणी केली.उपेक्षित वंचित समाजाचे दुःख,अन्याय, अत्याचार त्यांनी आपल्या गाण्यात मांडले व बहुजन समाजाचे स्फुलिंग पेटविली आहे.वामनदादा च्या प्रबोधन चळवळी मुळेच बुद्ध,शिवराय,फुले आंबेडकर महाराष्ट्राच्या वाड्यावस्त्या बरोबरच घरा घरात पोहचविण्याचे काम त्यांनी केले आहे.आपल्या आयुष्यातील 61वर्ष दादा सजसेवेचा वसा घेऊन सामाजिक परिवर्तना साठी आपल्या पायाला भिंगरी बांधून राज्य भर फिरले.हे काम करत असताना त्यांनी कधीच स्वतःचा आर्थिक विचार केला नाही.
आपल्या सार्वजनिक आयुष्यात पैशाला महत्त्व न देता उपेक्षित समाजाला प्रबोधन करीत, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत झिजत राहिले.मानवी मूल्यांची जपणूक करीत दादांनी बुद्ध,शिवराय, फुले,आंबेडकर यांच्या विचारांचे वाहक बनुण काम केले,अश्या ह्या महान लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष शासन स्तरावरून साजरे व्हावे,व दादांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या सर्व शाहीर व कलावंतांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घ्यावी अशी आग्रही मागणी लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रविण गिते यांनी एका निवेदना द्वारे तहसील कार्यालय सिंदखेडराजा यांच्या मार्फत, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे कडे केली आहे.