गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- तालुक्यातील सुनगांव येथील विद्युत पुरवठा हा या ना त्या कारणाने नेहमी चालू बंद करण्यात येत असतो त्यातच दोन महिने अगोदर सुनगांव गावठाण फिडर वरील ट्रि कटिंग च्या नावाने चार दिवस सतत सकाळी सात ते दुपारी दोन वाजे दरम्यान विद्युत पुरवठा बंद केला होता तरीही दिनांक 9 जुलै रोजी महावितरणने ट्रि कटिंग च्या नावावर सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाईन बंद ठेवली होती. कधीही सुनगाव येथील विद्युत पुरवठा हा चालू बंद स्थितीत असतो. उमापूर येथील सब स्टेशनला फोन लावल्यास फोन लागत नाही लागल्यास महावितरणचे कर्मचारी नागरिकाना उडवाउडवीची उत्तरे देत असतात. सुनगांव येथील वसुली 90 टक्के असून सुद्धा कर्मचारी वसुलीशिवाय दुसरे कोणतेच काम करताना दिसत नाहीत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वेल्डिंग व्यवसाय, गिरण्या ,बँकेचे व्यवहार घरातील गृहिणींची कामे ,ऑनलाइन अभ्यास,त्यात सर्वात मोठा विषय म्हणजे गावाला होत असलेला पाणीपुरवठा यावर सर्वात मोठा परिणाम होतो.
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-22-at-14.24.39-1024x768.jpeg)
त्यामुळे त्रस्त होऊन सुनगाव येथील नागरिकांनी दिनांक 12 जुलै रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी सहाय्यक अभियंता कातखेडे यांना निवेदन दिले होते परंतु त्याची महावितरणने कोणतीच दखल घेतली नाही, त्यामुळे सुनगाव येथील नागरिकानि सुनगाव चा विद्युत पुरवठा जळगाव जामोद येथील शनिमहाराज मंदिराजवळील नवीन सब स्टेशन वर किंवा जामोद येथील सब स्टेशन वरून टाकण्यात यावा तसेच सुनगाव येथील ग्रामपंचायतीने मागील वर्षी या बाबत ठराव दिला होता
परंतु एक वर्ष होऊनही या कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नाही सुनगाव च्या समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यामुळे सुनगाव येथील नागरिक हे आज दिनांक 22 जुलै पासून महावितरण कार्यालया समोर उपोषण थाटले आहे या उपोषणास सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेव धुर्डे माजी पं.स.सदस्य अशोक काळपांडे , प्रवीण धर्मे, मोहनसिंग राजपूत, ग्राप सदस्य बळीराम धुळे, ग्राप सदस्य संतोष वंडाळे,सखाराम मिसाळ, पत्रकार गणेश भड ,पत्रकार अनिल भगत उपोषणास बसले आहेत व जोपर्यंत मागण्या पूर्ण व विद्युत पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यत उपोषण सुरू राहणार असा इशारा सूनगाव नागरिकांनी दिला आहे.