ग्रामीण भागात घरकुलाचे अनुदान वाढवून देण्याबाबत सरपंच सुनील यांनी लिहिले ग्राम विकास मंत्र्यांना पत्र…
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच असलेले सुनील डिवरे हे त्यांच्या विविध कामामधून नेहमी चर्चेमध्ये असतात. अशी चर्चा त्यांच्या आता एका पत्राने केली आहे. त्यांनी चक्क ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाच एक पत्र लिहिले आहे त्यांनी पत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये घरकुलाचे अनुदान वाढवून देण्याची ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली आहे. ग्रामीण भागात विविध योजनेच्या माध्यमातून घरकुलाचे बांधकाम फार मोठ्या स्वरूपात होत आहेत परंतु सध्याच्या महागाईच्या काळामध्ये प्राप्त होणारी शासनाची रक्कम ही तुटपुंजी पडत आहे. त्यामुळे गरिबांचे घरकुलाचे स्वप्न हे अपूर्ण राहात आहे.सध्याच्या काळामध्ये महागाईचा भडिमार त्यातच बांधकाम साहित्याचे अवास्तव वाढलेले भाव यामुळे गरिबांचे घरकुल या तुटपुंज्या रकमेमुळे पूर्ण होत नाही त्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामीण घरकुल योजनेमध्ये आणखी पन्नास हजार रुपयाचे वाढीव अनुदान देण्यात यावे त्यामुळे गरीब नागरिकांच्या स्वप्नातील घर आनंदात पूर्ण होईल या पत्रामुळे आसलगाव येथे सरपंच सुनील डिवरे यांचे कौतुक होत आहे.