
मेहकर देऊळगाव साकर्शा : येथील विवाहित महिले सोबत प्रेमाचे संबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिश देत त्या महिलेचा गर्भपात करून फरार आरोपीला पकडण्यात जानेफळ पोलिसांना दीड महिन्यानंतर यश आले असून सदर आरोपीला अटक करण्यात आले आहे
पोलीसस्टेशनच्या माहितीनुसार अडीच महिन्यांपासून फरार आरोपी सुरेश नामदेव उमाळे वय 41 राहणार देऊळगाव साकर्शा याने गावातीलच विवाहित महिलेसोबत लग्नाचे आमिष देऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. व त्यामध्ये महिलेला गर्भधारणा झाली. आरोपी सुरेश याने अकोला जाऊन डॉक्टर कडे त्या महिलेचा गर्भपात केला. महिलेला समजले की आपली फसवणूक झाली त्या महिलेने जानेफळ पोलीस स्टेशन गाठुन सदर तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविल्याचे आरोपीला समजतात आरोपी फरार झाला होता. 25 जून रोजी पुण्याला जाऊन राहुल गोंदे ठाणेदार यांनी पकडून पोलीस स्टेशनला हजर केले . आरोपीचा पि.सि आर काढण्यासाठी मेहकर येथे हजरकरण्यातआले.त्याच्याविरुद्ध गुन्हा नंबर 208/21 कलम 376 सह विविध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस स्टेशनचे अधिकारी राहुल गोंदे हे तपास करत आहेत.