Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

किनगावराजा येथील शेतकऱ्याचा कृषी विभागकडुन सत्कार.

VIKEL TE PIKEL

किनगावराजा(प्रतिनिधी सचिन मांटे)- सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा मधील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण जाधव काही दिवसापूर्वी यांनी सेंद्रिय पद्धतीने मिरचीची शेती (१०गुंठे चे शेडनेट ६०×१५०)करून १ लाख रुपयाचे उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांनपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.शेती करताना शेतकऱ्यांना अनेक असमानी संकटाना तोंड द्यावे लागते पण या संकटावर मात करत कमी जमीनमध्ये पण आपन उत्पन्न घेऊ शकतो हे एक उदाहरणं आज ज्ञानेश्वर जाधव यांनी दिले.सुरवातीला मिरची लागवड करून त्यावर कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत व केमिकल चा वापर न करता गांडूळ खत याचं वापर केला दैनंदिन जीवनात येणाऱ्या पदार्थ दुध, ताक,हळद,गूळ यांचा वापर करून मिरची फवारणी साठी उपयोग केला.मिरची लागवड करून ६ महिन्यात त्यांनी १ लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळवले आहे.कमी खर्च व आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा व औषधं वापर न करता सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलोकन करावा जेने करून भविष्यात रासायनिक खताचा उपयोग टाळून आपल्या जमीनीची उगम क्षमता वाढविण्यास मदत होईल व जमिनीत क्षाराचे प्रमान वाढणार नाही सेंद्रिय शेती करून जमीन भुसभुसशीत रहाते व कुठलाही दुष्परिणाम होत नाही.महाराष्ट्रशासन यांच्या कडुन संत सावता माळी रयत बाजार सेंद्रिय शेती करनाऱ्या शेतकऱ्यांना वाव मिळाला पाहिजे कृषी विभाग यांच्या कडून ‘पिकेल ते विकेल’ या स्लोगन चीविक्री करण्यासाठी छत्री देऊन गौरव करण्यात आला व त्याप्रसंगी आज किनगावराजा येथे विक्री केंद्राचे दुसरबीड,राहेरी,किनगावराजा चे माजी प्रशासक किशोर पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले,त्याप्रसंगीं कृषीसेवक बगाडे,अनंत शेळके,नारायण जाधव,रामेश्वर मुंढे,शिवाजी काकड,नंदकिशोर मांटे,ज्ञानेश्वर कायंदे,निलेश जाधव,प्रदीप जाधव,संतोष शिंदे.इतर गावकरी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.