गजानन सोनटक्के जळगाव जा – क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला 8 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथे काँग्रेस च्या वतीने जळगाव शहरात मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रॅलीकरीता उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सर्वप्रथम दुर्गा चौक येथे शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले तदनंतर शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विशवस्त स्व. शिवशंकर भाऊ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शहीद जवान तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सतत अकरा वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार स्व. गणपतरावजी देशमुख यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
देशभक्तीपर गीतांसहित, देशभक्तीपर नार्यानी जळगाव जामोदचा परिसर दुमदुमून गेला