चिखली -चिखली तालुक्यातील कोनड खुर्द येथील ग्राम सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक अविरोध संपन्न झाली एकूण 13 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये 12 अर्ज सर्वानुमते दाखल करण्यात आले VJNT मतदार या गावात नसल्याने एक जागा रिक्त राहिली नवनियुक्त संचालकांची नावे खालील प्रमाणे आहेत भास्कर त्र्यंबकराव जावळे, रामदास अश्रू जावळे, रामदास पांडुरंग जावळे, श्रीमती पारूबाई नारायण जावळे, राजीव भगवानराव जावळे, दौलता अमृता वानखेडे, पंजाबराव गुलाबराव जावळे, सौ प्रमिला भिकाजी सुरडकर, अशोक वामन दिवटे, देविदास कडुबा जावळे, दामोदर भिमराव वानखेडे, यादव तुकाराम वानखेडे.
सहकार विभागाने दिलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आजचा दिवस अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस होता आज एकूण बारा अर्ज सर्वानुमते सादर करण्यात आले त्यामुळे वरील बारा जणांची नियुक्ती ही अविरोध करण्यात आली.
या नियुक्ती निमित्त सर्व नवनियुक्त संचालकांचे चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष राजीव भगवानराव जावळे यांच्या आभाळमाया निवासस्थानी सर्व नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सर्व संचालकांसमवेत कोनड खुर्द येथील सरपंच दादाराव सुरडकर, उपसरपंच प्रतिनिधी गजाननराव जावळे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ वानखेडे, माजी सरपंच तुळशीदास जावळे, पवन जावळे, गजानन क-हाडे, गजानन जावळे इत्यादी उपस्थित होते.